पुस्तक-परिचय : एकविसाव्या शतकाची तयारी (भाग १)
Preparing for the Twentyirst Century हे पॉल केनेडी या अमेरिकेतील येल विद्यापीठातील इतिहासाच्या प्राध्यापकाचे अतिशय लक्षणीय आणि महत्त्वाचे पुस्तक १९९३ साली प्रकाशित झाले. त्यात एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या मानवजातीपुढे कोणत्या समस्या वाढून ठेवल्या आहेत, कोणती भयस्थाने आणि कोणती आशास्थाने तिच्यापुढे उभी राहणार आहेत, यांचे अत्यंत विचारप्रवर्तक आणि समर्थ विवेचन लेखकाने केले आहे. लेखक अतिशय …